एकलव्याची कहाणी बालमित्रांनो, मी तुम्हाला आज अशा एका शिष्याची गोष्ट सांगणार आहे की ज्याने स्वत:च्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर धनुर्विद्येचे ज्ञान प्राप्त केले. बालमित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की, पांडव आणि कौरव यांचे गुरू द्रोणाचार्य होते. द्रोणाचार्य त्यांना धनुर्विद्येचे ज्ञान देत असत. एक दिवस एकलव्य नावाचा अत्यंत गरीब मुलगा द्रोणाचार्यांकडे आला आणि द्रोणाचार्यांना म्हणाला, "मला धनुर्विद्या शिकायची आहे. तरी आपण मला धनुर्विद्येचे ज्ञान द्यावे." तेव्हा द्रोणाचार्य यांनी त्याला सांगितले, "बाळ, मी तुझी धनुर्विद्या शिकण्याची इच्छा समजू शकतो. परंतु मी फक्त पांडव आणि कौरव या राजकुमारांनाच धनुर्विद्या शिकवीन, इतर कुणाला शिकविणार नाही, असे वचन मी भीष्म पितामह यांना दिलेले आहे. त्यामुळे मी