अघटीत भाग ९ नाश्ता टेबलवर नाश्ता करताना क्षिप्राने खुप आनंदी असल्याचा आव आणला होता . कारण बाबा बरेच काही बोलत होता ...त्याचे बरेचसे बोलणे तिच्या कानावर फक्त पडत होते . मनात मात्र विचारांची गर्दी होती . आई दोनतीन वेळ म्हणाली सुद्धा ...”अग नीट खा ना लक्ष कुठाय तुझे ?.. खोलीत फोन सायलेंट वर ठेवला होता पण त्यावर गौतमचे कॉल असणार ही तिला खात्री होती . सर्वांचे आवरल्यावर ड्रायव्हरने सर्वांचे सामान गाडीत नेऊन ठेवले . सर्वजण बाहेर पडताना वरदा कुलूप लावायला घेणार इतक्यात क्षिप्रा म्हणाली “आई थांब थांब माझा मोबाईल घरातच राहीला आहे . “ये पटकन .... बाबा गाडीत जाऊन बसलाय