अघटीत - भाग ७

(20)
  • 13.1k
  • 2
  • 7.6k

अघटीत भाग ७ दुसर्या दिवशी कॉलेजला गेल्यावर क्षिप्राच्या आजीने तिच्या आईला वरदाला बोलावले . आणि तिला जे जे काही क्षिप्रा बाबत संशयास्पद वाटत होते ते बोलून दाखवले. वरदा पण थोडी काळजीत पडली ,तिने ठरवले आता थोडे कड्क धोरण घ्यायला हवे . पद्मनाभच्या कानावर पण घालावे असे तिला वाटले पण सध्या तो फार गडबडीत होता बरीच टेन्शन होती ..त्यात आणखीन ही भर नको असा विचार करून ती शांत राहिली . मात्र क्षिप्राला तिने थोडी समज दिली ,थोडे गोड बोलूनच हे काम करायला हवे होते ना .. क्षिप्राने पण थोडा कांगावा केला ... पण आईने सांगितले ते आपल्याला पटले असे दाखवले .