" घाई करायला हवी..." हातातील सामान पटापट पिशवीत भरत गुरुजी ओरडले. अनयच्या हाताला खेचत ओम त्याला त्याच्या घरी घेऊन आला होता. अचानक भेटणं, ओळख दाखवणं, हक्काने ओढत घरी घेऊन येणं.... अनयसाठी ओमच वागण अनपेक्षित असल तरीही त्याला ह्या क्षणी कशालाच विरोध करायचा नव्हता. ओमच्या घरी आल्यावर त्याला अजून एक धक्का बसला. तिथे गुरुजी व तिचे बाबा आधीच उपस्थित होते. जराही वेळ न दडवता जुजबी ओळख करून घेऊन ओम व गुरुजींनी मिळून त्याला सगळ काही थोडक्यात समजावलं. शेकडो वर्षांआधी घडल्या गोष्टींचे असे काही पडसाद उमटले जाऊ शकतात ह्याची त्या बिचाऱ्याला काही कल्पना नव्हती... जगात ह्या ही गोष्टी असतात....त्याची बुध्दी ह्या सगळ्यावर