अनय मागच्या काही दिवसापासून अतिशय अस्वस्थ होता. मागच्या घटनेपासून सर्व काही माहित असतानाही न थकता गुरुजींच्या शोधात कित्येक गाव पालथी घालून आला होता. आपल्या लाडक्या बायकोची अशी दयनीय अवस्था त्याला पाहवत नव्हती. भलेही तिला प्रेम नको वाटू दे पण त्याच प्रेम तर होत ना. प्रेम ही नेहमीच काही मिळवण्याची गोष्ट नाही. पण जर जोडीदाराच्या चेहऱ्यावरच्या थोड्या आनंदाने जर तुमच्या तुटलेल्या काळजाच्या जखमा भरून निघत असतील तर... तिच्या आनंदापेक्षा दुसरे कोणते औषध नाही... अनयही असाच तिच्या चेहऱ्यावर हास्य ठेवण्यासाठी झटत होता. तिच्या अवस्थेला स्वतःला जबाबदार समजून आतल्या आत कुढत होता. त्यात तिच्या वडिलांची अवस्था बघून त्याला कीव येई. व आज सकाळी