" मी.. नाही.. मी कसा काय..." अचानक सगळी जबाबदारी त्याच्यावर टाकली गेल्याने ओम गडबडून गेला." तूच सांग तू कसा काय आलास ह्या सगळ्यात.. आपली भेट.. त्यानंतर काहीतरी अभद्राची चाहूल लागण.... त्या भारलेल्या भागातून सहीसलामत येणं.. त्या काळोख्या वातावरणातून योग्य मार्ग शोधत इथे पोचणं.." गुरुजींना त्यालाच प्रश्न विचारले." मी...." त्याच्या मनातील प्रश्न गुरुजींनी त्याच्याच समोर मांडले होते. " तू... विश्वनाथ शास्त्रींचा वंशज आहेस... त्यासाठी तुला तुझ्या घराण्याचा सगळा इतिहास खोदून काढावा लागेल पण तितका वेळ नाहीये आता... मला सांग हे तुझ्या गळ्यातील लॉकेट कोणी दिलं तुला..?" " हे.. माझ्या वडिलांनी... आमच्या घराण्याची परंपरा आहे..." ओम बोलता बोलता विचारांत हरवला." हा तोच मंतरलेला खडा