कादंबरी- जिवलगा ...भाग - १७

(17)
  • 22.6k
  • 2
  • 12.3k

कादंबरी – जिवलगा....भाग-१७ वा ले- अरुण वि.देशपांडे --------------------------------------------- मधुरिमा म्हणाली ..नेहा , आपले जेवण वगरे झालेले आहे, घरी जाऊन झोपणे “एव्हढेच काम , तुला उद्या ऑफिस ..! आणि मी , मला थोडेच कुठे जायचे घराच्या बाहेर , आराम करीन . पण, आता आपण मस्त .. एक लांब चक्कर मारू या का कार ने ..? रात्रीच्या वेळी .फार मजा येते लॉंग- ड्राईव्हला. मी मस्त गाडी चालवते , तू गप्पा मार , सोबत गाणी लावू या ,हे असे मला खूप आवडते . आपण दोघी आज पहिल्यांदा अशा मूड मध्ये फिरणार आहोत. नेहा ,मला आवडते हे असे सगळे , पण, तुला आवडेल ना