कादंबरी- जिवलगा .. भाग - १६

(13)
  • 19.3k
  • 3
  • 12.7k

कादंबरी जिवलगा ले- अरुण वि.देशपांडे ----------------------------------- कादंबरी – जिवलगा .. भाग- १६ वा --------------------------------------------------- कंपनी आणि जॉब जॉईन करून आता नेहाला पंधरा दिवस होऊन गेले होते .पहिले दोन-चार दिवस टाईम-टेबल सेट होण्यास वेळ लागला होता . त्यासाठी घड्याळाशी दोस्ती करावी लागली , स्वतहाला थोडे जास्त अलर्ट व्हावे लागणार “याची जाणीव होताच नेहाने नव्याने काय काय करायचे ? याची लिस्ट तयार केली आणि त्याप्रमाणे दिनक्रम सुरु केल्यावर मात्र ..तिची गाडी रुळावर आली, मावशी आणि काका ..त्यांच्या ठरलेल्या तारखेला परदेशी रवाना झाले, त्यांना एअर-पोर्टपर्यंत सोडण्यासाठी मधुरिमासोबत नेहा पण गेली होती. एअरपोर्टकडे जातांना नेहाच्या मनात विचार येत होते .. माणसाच्या नशिबात काय नि