ती एक शापिता! - 10

  • 8.3k
  • 3.8k

ती एक शापिता! (१०) त्या सकाळी आलेल्या वर्तमानपत्रातील बातमीने सुबोधचे स्वागत केले. 'पत्नी आणि प्रियकराने मिळून पत्नीच्या मुलाचा खून केला...' मथळा वाचूनच एकूण घटना त्याच्या लक्षात आली. पुर्ण बातमी वाचण्याची त्याला गरजच भासली नाही. कारण त्या शीर्षकानेच त्याच्या डोक्यात विचार चमकला...'सुहासिनी-निलेशचे संबंध आता अत्यंत मोकळेपणाने सुरू झाले असतील. सुहासिनी सुखसागरात मनसोक्त विहार करीत असेल. ती समाधानी असेल. परंतु तशा काळात... तिच्या आनंदमयी वाटेत अशोक... अशोक आला तर? कालांतराने तो त्यांच्या संबधात अडसर ठरू लागला तर? ते दोघे मिळून तो अडसर म्हणजे अशोकला ... नाही. नाही. हा काय वेडेपणा करून बसलो मी. मला हा निर्णय घेताना अशोकची आठवण का आली नाही?