ती एक शापिता! - 5

(14)
  • 9.6k
  • 1
  • 5.1k

ती एक शापिता! (५) नेहमीप्रमाणे निलेशने सुबोधच्या वाड्यात प्रवेश केला. वाड्याशेजारच्या ओट्यावर बसलेल्या काही टारगटांनी एकमेकांना खाणाखुणा केल्या. एक-दोन शब्दही उच्चार. तिकडे दुर्लक्ष करीत निलेश सुबोधच्या खोलीत शिरला. सुबोधच्या त्या आजारापासून निलेशचे जाणे-येणे जास्तच वाढले होते. सुबोध त्या दिवशीनंतर आठ-दहा दिवस झोपूनच होता. ते गोळी प्रकरण निलेशलाही समजलं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्टीने अशक्त झालेल्या सुबोधला निलेशने बरेच सांभाळले. त्याच्या आजारापूर्वी कामानिमित्ताने येणारा निलेश दररोज येऊन त्याची चौकशी करून त्याला धीर देत होता. सुबोधलाही निलेश आला की, खूप बरे वाटायचे. तिघेही एकाच कार्यालयात असल्यामुळे निलेश आणि सुहासिनीमध्ये संकोच नव्हता, वागण्यात मोकळेपणा आणि सहजता होती. डॉक्टरांकडून ते गोळी प्रकरण शेजारी आणि गल्लीतही