ती एक शापिता! (४) सुहासिनीला साहेबांच्या दालनात जाऊन अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. त्यामुळे बाहेर सुबोधचे कामात लक्ष लागत नव्हते. 'साहेबांची स्वाक्षरी घ्यायला इतका वेळ? सही घ्यायला स्वतःच का जायला पाहिजे होते? शिपाई कशासाठी आहे? त्याच्यासोबत पंजिका पाठवता आली असती. सुहासिनी नेहमीच साहेबांकडे का जाते? एकदा तिला समजावून सांगितले पाहिजे. हिच्याकडे बघताना साहेबांची नजर काही वेगळीच असते. गल्लीतल्या टारगटांच्या नजरा ओळखणाऱ्या सुहासिनीला साहेबांची नजर ओळखता येत नाही? साहेबांचा स्वभाव लक्षात आल्यानंतरही हिने वारंवार त्यांच्या दालनात का जावे? ' सुबोध तशा विचारात असताना शिपाई किसनने विचारले, का हो साहेब, काय विचार करता? काही नाही रे सहजच. डोकं जड पडलंय. सुबोध