ती एक शापिता! - 2

(11)
  • 10.5k
  • 6.8k

ती एक शापिता! (२) सुबोधच्या आत्याची तेरवी झाली. तेरवीसाठी जमलेली पाहुणेमंडळी निघून गेली. सुबोधचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारले होते. त्याची आत्याही बालविधवा होती. सुबोध आत्याकडे राहायला आला. आत्याने त्याचा सांभाळ केला. त्याला लहानाचा मोठा केला. सुबोधचे बी. कॉम. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर तो एका सरकारी कार्यालयात नोकरीला लागला. तसे त्याच्या आत्याने अंथरूण धरले ते कायमचेच! आत्याच्या मृत्यूनंतर सुबोध एकाकी पडला... सरकारी काय किंवा इतर कार्यालये काय सारे जणू भ्रष्टाचाराचे आगार! तशा आगारात नोकरीला असलेला सुबोध प्रामाणिकपणे काम करताना भ्रष्टाचारापासून दूर होता हे कुणाला सांगितले तर खरे वाटायचे नाही. जणू कोळशाच्या वखारीत काम करूनही कपडे पांढरेशुभ्र असल्याप्रमाणे! परंतु हा समाज का प्रामाणिकपणे