ती एक शापिता! - 1

(18)
  • 17.4k
  • 1
  • 11.4k

ती एक शापिता! (१) सुबोधराव दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत बसले होते. सकाळपासून किती वेळ त्याचे वाचन केले असेल हे त्यांनाही माहिती नसेल. एक चाळा, वेळ जाण्याचे साधन म्हणून वर्तमानपत्र हातात घेणे, एक नजर त्यावर टाकणे आणि लगेच बाजूला ठेवणे असे त्यांचे सातत्याने चालू असे. तितक्यात त्यांचे लक्ष शेजारच्या टेबलवर ठेवलेल्या एका कागदाकडे गेले. कदाचित सुबोधरावांचे लक्ष स्वतःकडे वळविण्यासाठी त्या कागदाने फडफड जोरात सुरू केली असावी. त्यांनी तो कागद उचलला. घडी उकलत असताना त्यांचे लक्ष आतील अक्षरावर गेले आणि ते पुटपुटले, 'आँ! माधवीचे अक्षर दिसतंय. तिने चिठ्ठी का लिहिली असावी?' घडी पूर्ण उकलून होताच त्यांनी मजकूरसुरुवात केली... श्री. सुबोधराव... पत्रातील तसा मायना