माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 10

  • 5.8k
  • 1
  • 2.3k

१० माझी होशील का? वै निघून गेली नि मी तसाच बसून राहिलो.. फुलांकडे पाहात. जवळ कुणी असते तर चिमटा काढून कन्फर्म केले असते.. हे सत्य आहे की भास.. आभास, माझ्या फुकाच्या वल्गना की मनीच्या कल्पना! कल्पना वरून आठवले.. काॅलेजात माझा मित्र होता दोडक्या.. म्हणजे दिनेश दोडके.. त्याला दोडक्या म्हणत असू आम्ही सारे. त्याची लाईन होती एक कल्पना नावाची. एकदा असाच संध्याकाळी कट्ट्यावर बसलेला काॅलेजच्या. तिकडून कल्पना आली. याच्याशी बोलली काहीतरी. दोडक्या आपला आ वासून बसलाय ती निघून गेल्यावर. थोड्यावेळाने आम्ही पोहोचलो. दोडक्या म्हणतोय, अरे कुणी चिमटा काढा, हे स्वप्न आहे की सत्य! अर्थात ही चिमटे काढण्याची संधी आम्ही