माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 9

  • 6.7k
  • 2
  • 2.3k

९ सुंदर फुलाशी गप्पा तो अर्धा तास स्वप्नात रंगल्यासारखा होता. झाडांना पाणी घालता घालता गप्पा.. वै आणि मी. आमच्या गप्पा कशाबद्दल व्हाव्यात? आम्ही काहीबाही बोलत होतो.. पण त्यात तिला माझा वेंधळेपणाच जास्त दिसावा असे माझे बोलणे असावे असे माझे मलाच वाटत होते. पण मन ही मन में लड्डू फुटण्याचा आवाज येत असताना मी अजून करणार तरी काय होतो? उगाच विषय काढायचा म्हणून म्हणालो मी, "काय म्हणाले काल स्वामी?" "ओह! स्वामी! ही लुक्ड लाईक अ डिव्हाईन सोल. म्हंजे माला आवडला स्वामी अँड आश्रम. तशी माझा फेथ नाही स्वामी आणि बाबाजीवर. बट इट वाॅज नाईस टू बी विथ दिनकर." ही