माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 8

  • 6.5k
  • 1
  • 2.7k

८ देवाची करणी आणि बागेत पाणी कविता करणे संपवून मी उठलो नि काहीतरी करावे म्हणून फिरू लागलो इकडे तिकडे. पण आज किंवा आजवर जे झालंय त्याचा विचार काही मनातून जाईना. एक दोन दिवसात एवढा बदल होऊ शकतो? दुनिया बदल गई वगैरे गाणे गातात ना, त्याचा अनुभव घेत होतो. पण एकूण माझा विश्वास बसणार नाही असेच घडत होते आतापर्यंत. त्यात लग्नघरात लाडवांची कमतरता नसते. हवे तितके खा बुंदीचे लाडू. आजवर जे झाले त्यामुळे माझ्या मनातही असेच खूप सारे लाडू फुटत होते. सारे संकेत इथे अनुकूल दिसत होते. शेवटी काय योग म्हणावा! मी इथे येतो काय आणि ही वै भेटते