माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 7

  • 5.8k
  • 3
  • 2.2k

७ रूम फॉर द इंडियन ग्रूम! दिवसाची सुरूवात तर छानच झाली. चक्क तिच्यासमोर बसून आणि काही बोलणेही झालेले. अर्थात माझा वेंधळेपणा काही कमी झाला नव्हता.. पोहे खाताना मी ते थोडेफार सांडलेच. पण नेहमीच्या वेंधळेपणापेक्षा हा वेंधळेपणा वेगळा होता! एरव्ही वेंधळेपणा करत असे मी पण त्याला अंगभूत वेंधळेपणाच कारणीभूत होता. पण आताच्या या वेंधळेपणाला काही कारण होते.. खरेतर कार्यकारण भाव होता! कारण प्रत्यक्ष ती समोर बसून पाहात होती माझ्याकडे! पोहे सांडले खरे पण फक्त ते सांडताना वैदेहीचे लक्ष नसावे याचेच समाधान तेव्हा वाटले. तेव्हा म्हटले मी कारण पुढे तिने या पोहे सांडण्याचाही उल्लेख केव्हातरी केलाच. तिचे असे लक्ष होते