माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 5

  • 7k
  • 1
  • 3k

५ धागे आणि दोरे लुंगीत मी लुंगासुंगा वाटलो असेन का तिला? असेल.. जे व्हायचे ते होऊन गेलेले. त्यात करण्यासारखे आता काही नव्हते. आता फक्त स्मार्ट होणे आवश्यक. मी पटकन वर जाऊन कपडे बदलले. होता होईल तो स्मार्ट झालो नि बाहेर आलो. पण मी बाहेर येईतोवर नक्षत्रा निघून गेलेली. म्हणजे दरवाजा बाहेरच्या चपला नाहीशा झालेल्या. परत त्या येतील की नाही कुणास ठाऊक. आता करावे तर काय करावे? मी वाचलेली सारी डिटेक्टिव्ह पुस्तके मनात जागी झाली. माहिती काढण्याच्या पद्धती असतात. माहिती देणाऱ्यास आपण माहिती देत आहोत हेच माहिती नसावे अशा काही! एखादा डिटेक्टिव्ह धनंजय जणू संचारला माझ्यात. आता आईकडूनच मिळतील