४ नक्षत्राचे दर्शन तर मु.पो.काकाचे घर! हा काका म्हणजे दिन्या काका. माझ्या बाबांहून लहान. आम्ही त्याला एकेरीतच हाक मारायचो. दिन्या काका तसा लहान भाऊ असला तरी शिस्तीचा कडक. काकू म्हणजे रमाकाकू त्याच्याच सारखी. कडकलक्ष्मी! अर्थात दोघे तसे प्रेमळ होते. पण कर्मठ होते. आमच्या घरी बाबा असे नव्हते. देवधर्म वगैरे जेवढ्यास तेवढे. आई पण तशी धार्मिक नव्हती. पण काका मात्र अत्यंत काटेकोरपणे सारे देवधर्म पाळे आणि त्यातली चूक त्याला खपत नसे. त्यामुळे त्याच्या घरी मला त्याच्या शिस्तीचे टेन्शन असे. त्या शिस्तीच्या चिखलात माझ्या प्रेमकहाणीचे कमळ त्यामुळे अगदी उठून दिसते मला तरी आज मागे वळून पाहताना. काकाचे घर मोठे असले