जुळले प्रेमाचे नाते - भाग-६५

(65)
  • 13.4k
  • 7
  • 5.6k

आम्ही तिघे ही त्या कॅफेमध्ये परत न जाता घरी गेलो. कारण राज आणि माझ्यासाठी हे धक्कादायक होत. हर्षलने माझा खून करण्याचा प्रयत्न हा विचारच मला नकोसा वाटत होता. शेवटी परत मॉल आणि आम्ही दोघांनी आप- आपलं घर गाठलं. मी काही ही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. गप्प जाऊन स्वतःच्या रूममधे गेले आणि मनसोक्त रडले.. "का रडु नये..!!.. जिला मी माझी बेस्ट फ्रेंड मनात होते. जी माझ्यासाठी माझ्या बहिणी सारखी होती.. खरतर मानलेली बहिणीच आणि तिनेच मला जीवे मारण्याचा विचार करावा.. काळीज पिळवणूक टाकणार सत्य आज मला निशांतकडून कळल होत.." रडून रडून डोळे लाल झालेले.. कोणाला कळु नये म्हणुन बाथ घेतला.. आणि हसऱ्या चेहऱ्याने मी