माझी ईच्छा नसताना ही ते मला कराव लागणार होतं. कारण कालच निशांतला दुखापत झाली होती. आता त्याला गमावण शक्य नव्हतं.. नाही.., हो करत मी ते गिफ्ट काऊंटर वरून घेतलं.. "घेतलंस ते गिफ्ट..!! गुड गर्ल. आता ते ओपन कर आणि त्यात जे काही आहे ते उद्या घालुन यायच आहे. पत्ता आज रात्री पाठवतो. आणि हो रागात फाडून टाकण्याचा प्रयत्न करू नकोस.. नाही तर मला तुझ्या लाडक्या निशांतला त्रास द्यावा लागेल. तसा ही तो मध्ये मध्ये येत आहेच म्हणा.. पण ठीक आहे काही दिवसच. नंतर आपण जाणारच आहोत सर्वांपासून दूर... जिथे असु फक्त तु आणि मी...." आणि त्याचा तो हसण्याचा आवाज माझ डोकं