जुळले प्रेमाचे नाते - भाग-६२

(21)
  • 10.1k
  • 2
  • 4.3k

सकाळी घडलेला प्रकार आम्ही कोणालाही सांगायचं नाही असं ठरवलं होतं. कारण आधीच घरात तणावाच वातावरण असल्याने निशांतला अजुन कोणाला टेंशन द्यायचं नव्हतं. पण तो कॉल कोणी केला याची माहिती निशांत काढणार होता. यासर्वात मध्ये अनभिज्ञ होते ते आजी-आजोबा. त्यांना मात्र काहीच माहीत नव्हतं. आणि आम्ही ही ते त्यांना सांगणार नव्हतोच. मी स्वतःच्या रूममधे कॉलेजचा अभ्यास करत बसले असता बाबा आले. इकडच्या, तिकडच्या गप्पा झाल्या, पण मी कोणालाही आज घडलेला प्रसंग काही सांगितला नाही की मला आलेला कॉल. त्या गप्पा जेवनाच्या टेबलावर ही सुरूच होत्या. जेवुन मी स्वतःच्या रूममधे बसले असता मला निशांतचा कॉल आला.."हॅलो हनी-बी... निशांत बोलतोय." "हा बोल ना.. काही माहिती मिळाली का