*चित्ती असू द्यावे...!* लक्ष्मीबाईंनी दरवाजा उघडताच विष्णूपंतांनी तणतणत घरात प्रवेश केला. खांद्यावर अडकवलेली शबनम सोफ्यावर फेकून स्वतःचे शरीरही सोफ्यावर दाणकन आदळले. त्यांच्या तशा वागण्यावरून लक्ष्मीबाईंनी ओळखले की, स्वारीचे काही तरी बिघडले आहे. पतीसाठी पाणी आणण्यासाठी आत जाताना त्या मनातल्या मनात पुटपुटल्या, 'कधी यांचा स्वभाव बदलेल काही समजत नाही. वयाची साठी ओलांडली आहे पण स्वभाव लग्न झाल्यावर होता तसाच आहे. वाढत्या वयानुसार स्वभाव बदलतो म्हणतात पण आमच्या रावांचे तसे नाही. कुठे एखादी गोष्ट पटली नाही की ह्यांच्या