लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १२)

  • 13.5k
  • 4.9k

“रोशनी.. प्लिज माझ ऐक.. मी नाही म्हणतं जे झालं, तु जे पाहीलेस ते खोटे आहे म्हणुन. पण माझ्यात खरंच बदल झालाय रोशनी. मी खरंच तुझ्यावर प्रेम करायला लागलोय. मला तुला मारण्याची अज्जीब्बात इच्छा नाही रोशनी.. पण..” असं म्हणुन जोसेफने ते जे.के प्रकरण, सोनीचा खुन ह्याबद्दलचे सर्व रोशनीला सांगीतले. “आय पिटी यु जोसेफ.. पण मला तुझ्याबद्दल आता काहीच वाटत नाही. तु ह्या प्रकरणातुन कसं बाहेर पडायचं तो तुझा प्रश्न आहे. यापु्ढे तुझा आणी माझा काहीही संबंध नाही जोसेफ. दोन चार दिवसांत तुला घटस्फोटाचे पेपर्स मिळतीलच पण त्यानंतर रोशनी एन्टर्प्रायझेसच्या कुठल्याही व्यवसायात तुझा काडीचाही संबंध किंवा हक्क रहाणार नाही. तुला आत्ताही माझ्या