लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ८)

  • 11.2k
  • 1
  • 4.5k

रोशनीच्या त्या रॉयल बेडवर नैना आणि जोसेफ एकमेकांना बिलगुन पहुडले होते. “वॉव, व्हॉट अ फन राईड इट वॉज..”, नैना म्हणाली…”त्या रोशनीला कळालं नं हे, तर मला कच्चे खाईल ती..” स्वतःशीच हसत ती म्हणाली, “बिच्चारी, लग्न झालं नाही की लग्गेच जावं लागलं तिला आणि ते पण थोडे थोडके नाही, एक महिन्यासाठी.. असो..रोशनी इथे नसताना तिचे वकील.. मि. फर्नांडीस ह्यांना एकदा भेटुन घे. त्यांच्याशी ओळख करुन घे. त्यांना सांग रोशनीची विमा पॉलीसी काढायची आहे. त्यांना दाखवुन दे की तुझे रोशनीवर कित्ती प्रेम आहे. ते इथे असतानाच रोशनीला एकदा फोन कर, तिच्याशी गोड गोड बोल. तसेच त्यांच्याकडुन इतर काही माहीती जसे रोशनीचे काही