लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ४)

(13)
  • 12.7k
  • 1
  • 5.3k

“मॅडम, त्या व्यक्तीचे नाव ’जोसेफ’ असे आहे. ’हेल्पलाईन’ मध्ये तो एक महीन्यापुर्वीच स्वयंसेवकाच्या पदासाठी भरती झाला. लहानपणापासुन तो अनाथच आहे. सिंधुताईंच्या.. हेल्पलाईनच्या प्रमुख, म्हणण्यानुसार जोसेफ आपल्या कामात चोख आणि प्रामाणिक आहे. संस्थेमध्ये काही दिवसांतच तो अनेक विद्यार्थ्यांचा लाडका झाला आहे. कुठल्याही प्रकारचे काम करण्यात तो मागे-पुढे पहात नाही. ह्या पुर्वी त्याचे स्वतःचे गॅरेज होते, पण परीस्थीतीमुळे त्याला ते विकावे लागले. काही ठिकाणी त्याने ड्रायव्हरचेही काम केले आहे. यापुर्वी करत असलेल्या कामाच्या ठिकाणांचे हे काही रेफरंन्सेस आणि रेकमंडेशन लेटर्स..”, असे म्हणुन नैनाने काही कागदपत्रांच्या प्रती रोशनीच्या समोर ठेवल्या. रोशनीने सर्व कागदपत्रं कागळीपुर्वक वाचली आणि मग ती नैनाला म्हणाली, “हे बघ नैना,