आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 8

  • 7.3k
  • 1
  • 2.9k

तुमची ओळख: राहणीमान आणि सदयपरिस्थिती (काळ: निवडणुकीसंबधी घोषणा सुरु होण्याअगोदरचा) संध्याकाळच्यावेळी पटरीवरच्या चहावाल्याला उगाच हात दाखवावा, त्यानं तुमच्या ऑर्डरचा इशारा समजावा, तुम्ही तितक्यात तिथं पोहचावं, चहाचा ग्लास हातात दयावा, थोडयावेळाने त्यांनं उधारीचा विषय काढला की “लिहलं आहेस ना माझ्या खात्यावर बास”, म्हणत बाजूच्या पानपटटीवालाकडनं एक सिगरेट घ्यावी ती पण उधारीवर, एका हातात चायचा कप दुस-या हातात झुरका सोडत शेगलेली सिगार, डोकं काम करायला लागलयं, आजूबाजूचं वातावरण नकळत बदल्यासारखं वाटतं, कुठल्यातरी अंधा-या खोलीचं दार करकर करत उघडावं आणि नवा प्रकाश आल्यासारखं वाटवं, असंच होत सिगेरट ओढल्यावर, लगेच घेतलेले सगळे निर्णय बरोबर वाटू लागतात, कश्याचाच पश्चाताप होत नाही, बरोबर केलं आपण प्रत्येक