माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 1

(14)
  • 12.8k
  • 2
  • 7.6k

१ सुरुवात! कुठल्यातरी हिंदी सिनेमात एकदा पाहिले, म्हणजे ऐकले होते.. दुसऱ्या कुणाच्या लग्नात अजून कुणाची लग्नं जमत असतात म्हणे! .. म्हणजे तिकडे बोहल्यावर पद्धतशीर लग्न सुरू असते.. नवरानवरी बोहोल्यावर हाती माळा घेऊन सलज्ज वगैरे उभे असतात. भटजीबुवा पुढच्या आयुष्यातील तारांबळ कळावी म्हणून चंद्रबलं आणि ताराबलं वगैरे घसा फोडून गात असतात.. नि इकडे कुणी होतकरू आयुष्यातले ते एकमेव ध्येय असल्यासारखा आपली लाइन जमवण्याच्या मागे लागलेला असतो. त्यात किती चूक की किती बरोबर हे नाही करायचे, पण एक आपले जनरल आॅब्झर्वेशन माझे. अजून एक निरीक्षण आहे माझे.. म्हणजे बघा हां.. आपल्याकडच्या लग्नांची ही एक गंमत असते. आपण मारे लगीनघाई वगैरे