★★ हेच खरे वास्तव! ★★ आमच्या वर्तुळात दिलीप गायतोंड तशी प्रसिद्ध वल्ली! त्याच्या माहितीनुसार तो आमच्या वर्तुळातच नव्हे तर तालुका, जिल्हा आणि काम पडलेच तर राज्यातही प्रसिद्ध अशी व्यक्ती! त्याचे कारण म्हणजे तो हाडाचा साहित्यिक होता. साहित्यिक म्हटलं की,त्यातही प्रकार आलेच. जसे जात म्हटली की, पोटजात येते त्याप्रमाणे! कुणी कवी असतो, कुणी कथाकार, कुणी कादंबरीकार तर कुणी सिनेमा क्षेत्रात काम करणारे. एखादा कुणी ललित लिहितो, कुणी निबंधकार तर कुणी चरित्रकार! यातही पुन्हा लेखनाच पोट जाती आल्याच. त्या म्हणजे विनोदी, गंभीर, सुटसुटीत, कुणालाही न