गप्पा -टप्पा मारत दुपारपर्यंत पुढे चालत गेले. आकाश - पूजा ग्रुपच्या पुढे , बाकी सर्व मागे. सुप्री - संजना - कादंबरी रमलेल्या गप्पात. जणू काही जुन्या मैत्रिणी." तुम्हाला कसं जमते ... शहरापासून दूर राहायला. " संजनाने विचारलं कादंबरीला." सवय झाली .... निघाले तेव्हा घाबरली होती. आता चालून जाते सर्व .. " ," आकाशला कधी पासून ओळखते तू ... " आता सुप्रीचा प्रश्न." तुम्ही आलात ना .... त्याच्या आदल्या दिवसापासून... पूजाचा जुना मित्र आहे तो... " , " तरी तुम्हाला कधी वाटतं नाही ... शहरात परत जाऊ असे ... " सुप्री. " आधी एक -दोनदा वाटलं ... त्या सोयी-सुविधा या अश्या ठिकाणी मिळत