" म्हणजे मी तर जोड्या जुळवणारी झाली तर.. पहिलं आकाश आणि पूजा ..... आता आकाश - सुप्री... तुम्ही सगळे काय get together खेळत आहात का ... " कादंबरी काहीही बडबडत होती." कसा आहेस ? " सुप्रीने आकाशला विचारलं." आहे ... ठीक आहे... " ...आकाश..." निघूया का .... " ," कुठे ? " ," घरी ... शहरात... " सुप्रीकडे बघतच राहिला आकाश. पूजाला कळलं, पुन्हा याच्या मनात घालमेल सुरु झाली आहे." डब्बू .... या दोघी दमलेल्या , भुकेलेल्या वाटतात.... आराम करा आज. उद्या पाहिजे तर निघा ... चालेल ना सुप्री... " पूजाला सुप्री नकार देऊ शकत नव्हती. तरी आकाशच्या चेहऱ्यावरून काहीच