ओटी, गा-हाणा आणि वायफाय

  • 10.2k
  • 2.8k

सुनंदा दरवशीप्रमाणं यंदापण देवीची ओटी भरुकं आपल्या दोन झीलांका घेवून माहेराकं ईला हूता. दोन झील…बारको सतरा आणि मोठो एकवीस वरशाचो. तळकोकणातला नारळापोफळीनं गच्च भरलेला गावं, गावाच्या कडेनं जाणारी नदी, तरीपण दोघवे काल संध्याकाळी मामाकडे ईलापासून हिरमुसले हूते. चारीबाजूनं डोंगर असल्याकारणानं मोबाईलचा नेटवरक दर दोन-दोन मिनिटानं येत-जायत व्हता. आता सकाळी ते दोघवे आवशीबरोबर देवळाकडे चाले हूते. एकदाचो इलो सडो! वीस मिनिटाची घाटी चलून घामाघूम झालेले झीलाकां बघून सुनंदा म्हणता “अरे हैतेशे आम्ही दिवसाचो पन्नासएक खैपा घालू…. आज तैची फळा तुमचो मामा खाता… माझी भैहनची बोळवण दरवरशी दोन आबेंच्या पेटायेवर करता हा…” देवळ्यालागी ईल्याबरोबर सुंनदाचो बारको झील नाराजीनं म्हणता ”मामा बोला होता