कादंबरी - जिवलगा...भाग- १५ वा , ले- अरुण वि. देशपांडे -------------------------------------------------------------------------------- नेहाला तिच्या ऑफिस मध्ये बसवून ,तिचा सगळ्यांशी परिचय करून दिल्यावर मधुरिमा बाहेर पडली .गाडी चालवता चालवता तिच्या मनामध्ये नेहाबद्दलचे विचार चालू होते. .आपण राहतोय त्या घराच्या मालकांची निम-शहरी भागातून आलेली नात्याने अगदी जवळची असणारी मुलगी- नेहा .. पहिल्यांदा तिला पाहून आपल्या मनात लगेच आले होते - .."कशी काय अशी राहते ही मुलगी ? ,गबाळी,वेंधळी असावी बहुतेक ? कसे होईल बाबा हिचे इथे ? काही खरे नाही हिचे "!असेच आपल्या मनात आले होते, हे आठवून आज मधुरीमाला नाही म्हटले तरी थोडे गिल्टी वाटत होते. अशा या नेहाला आपल्या प्रयत्नाने जॉब मिळवून देता आला , ती आज