तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १०

(23)
  • 15.2k
  • 3
  • 7.8k

" परंतु तीच का... असे अजूनही लोक असतीलच ना ह्या जगात.. मी ही कधी ना कधी विरंगुळा म्हणून अशीच कल्पनाचित्र रंगवत बसतोच..." ओमने कधीपासून मनात ठसठसनारा प्रश्न विचारला. त्याच्या प्रश्नावर गुरुजी फिकटसे हसले. कदाचित हा प्रश्न त्यांना अपेक्षित असावा. व तितक्याच शांतपणे उत्तरले. " ती म्हणजे.. शशिकलाचा पुनर्जन्म आहे.. " " काहीही..." ओम इतक्या सगळ्या कथांवर विश्वास ठेवणारा नव्हता. " हे खरंय ओम... माहितेय तुझा विश्वास बसणार नाही... मरण आपल्या शरीराला असतं.. आत्म्याला नाही.... " गुरुजींना माहित होत ओम सहजासहजी विश्वास ठेवणाऱ्यातील नाही आहे. " माफ करा गुरुजी पण मी ही थिअरी मानत नाही." अत्यंत नम्र शब्दात तो उत्तरला. त्याला मनात मात्र आपल्या उत्तराने