चंद्रग्रहण मध्यावर होत.. करालने समोरच्या यज्ञकुंडाभोवती चरबीचे दिवे पेटवले. बाजूच्या पात्रातील सफेद राखेने एक आकृती रेखाटली. त्या आकृतीच्या रेखा हळदी कुंकवाने भरून टाकल्या. चारीही बाजूला चार सफेद कवट्या व हाडांची रास रचली गेली. आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर खंजिराने वार करत त्याने स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला व मोठ्या आवाजात यक्षिणीला आवाहन करणं चालू केलं. त्याच्या तळव्यातून अखंड रक्ताची धार लागली होती पण मुखातून गगनभेदी मंत्रोच्चार चालू होते. चंद्रग्रहणाचा महत्त्वाचा प्रहर चालू झाला. इतक्या वर्षांची त्याची मनोकामना काहीच वेळात पूर्णत्वास जाणार होती. आणि अचानक कोंदट वाटणारा वारा जोरजोरात वाहू लागला. गढूळलेल्या वातावरणात अजुनच काळोख दाटला. वाऱ्याच्या फुंकरीने भडभडत जळणारे दिवे फरफर करत