तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ६

(21)
  • 17.6k
  • 10.3k

तरीही काहीजण परमेश्वर भक्तीची कास धरून लढा द्यायला उभे होते. मात्र करालच्या अमानुष महाभयंकर अत्याचारांसमोर कोणाचाच टिकाव लागला नाही. हे सगळं होत असताना एक व्यक्ती अखंड तपश्र्चर्येत लीन होती ती म्हणजे विश्वनाथशास्त्री. त्या भयंकर कोलाहलात स्वतःच्या मनाची शांती ढळू न देता भगवान शिवाची उपासना करणे हे एकच सत्य होत त्यांच्यासाठी. त्यांच्यावर प्रसन्न होऊन पुन्हा भगवंतांनी विश्वनाथशास्त्रीना आशीर्वाद दिला तो ह्याच भूमीवर. शत्रूचा नाश करायचा असेल तर आधी त्याचा मित्र व्हावं लागत ह्या उक्तीप्रमाणे विश्वनाथशास्त्रीही करालच्या समुदायात सामिल झाले. ह्या जगापासून अनभिज्ञ अशा कित्येक प्रकारच्या उपासना करालचे चेले करायचे. म्हणूनच आजवर कोणत्याच पुण्यात्म्याला करालला साधा स्पर्शही करणं जमलं नव्हत. तिथले प्रकार