कादंबरी - जिवलगा ... भाग - १३

(17)
  • 21.8k
  • 1
  • 13.7k

कादंबरी - जिवलगा .. भाग-१३ वा . ले- अरुण वि.देशपांडे -------------------------------------------------------------------- संध्याकाळची वेळ झालेली होती ..नेहाने बागेतील झाडांना पाणी देण्यात एक तास घालवला , तरी पण ,वेळ जाता जात नाहीये असे वाटून तिला खूप कंटाळून गेल्या सारखे झाले , हॉलमधून एक खुर्ची बाहेर आणून टाकीत नेहा शांतपणे बसून राहिली .आजकाल लोकांच्या मनात ..स्वतहा शिवाय दुसरा काही विचार येतच नाहीत की काय ? आणि कधी विचार आलाच तर तो असतो इतरांना फक्त तुच्छ लेखण्याचा .अशा लोकांना भेटून आल्यावर मला कळाले की माझे कहाणी बोरिंग होतीय ", अशा कमेंट कुणाकडून तरी कळतातच ,तेव्हा मनाला खूप वाईट वाटते . माझ्या आयुष्यात - चटपटीत सांगावे असे काही घडलेलेल नाहीच .मग ..तुम्हाला आवडेल असे ..रोमेंटिक..काय सांगणार