एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 14

  • 5.2k
  • 2.6k

भरपूर दिवसानी अजिंक्यशी मनमोकळा संवाद झाल्याने मृणाल खुश होती ..त्याने तिला अस्वस्थ असण्याच कारण विचारलं असताना तिने चुप्पी साधली होती ..पण तिने पुढे काही दिवसाच मनात होणारी घालमेल त्याला सांगायचं ठरवलं ..ती त्यासाठी एका अचूक संधीची वाट पाहू लागली ..फक्त प्रश्न हा होता की ती संधी तिला मिळणार की नाही ? काही दिवस झाले होते ..अजिंक्यच्या जवळच्या मैत्रिणीचा विवाह सोहळा होता ..घर बाजूलाच लागून असल्याने सर्व तयारी मध्ये तो त्यांना मदत करत होता ..विवाह रविवारला असल्याने त्याला सुट्टीच टेंशन नव्हतं शिवाय हॉलमधली सर्व अरेंजमेंट पण नीट झाली होती ..अजिंक्य सकाळपासूनच हॉलमधील सर्व तयारी पाहत होता ..सकाळपासून कामात असलेल्या अजिंक्यला