एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 13

  • 6.2k
  • 1
  • 3k

अजिंक्य सकाळी - सकाळी बाहेर फिरायला निघाला होता ..मृणालनेही बाहेर जाण्यासाठी हट्ट केला होता पण तिची तब्येत पूर्णपणे बरी झाली नसल्याने अजिंक्यने तीच काहीच एकल नाही आणि एकटाच फ़िरायला बाहेर निघाला ....फिरायला गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी तो मित्रांशी भेटला होता त्यामुळे कितीतरी वेळ तो तिथेच मित्रांशी बोलत बसला.. मित्रांशी गप्पा मारण्यात वेळ कसा निघून गेला त्यालाच कळले नाही ..अजिंक्य घरी परतला तेव्हा सूर्य बऱ्यापैकी वर आला होता ..घरी येताच तो सोफ्यावर निवांत बसत टिव्ही पाहू लागला ..तर मृणाल त्याच्या हातात चहा देत म्हणाली , " काय साहेब आज ऑफिसला जायचं नाही का ? " आणि अजिंक्य तिच्या हातातला कप