त्याला बघून मृणालचे हात - पाय थरथरायला लागले होते ..आणि तो अधिकच जवळ येऊ लागला ..ती तिथेच स्तब्ध उभी होती आणि तिने अजिंक्यच्या हाताची पकड अधिकच मजबूत केली ..तो तिच्या समोर येत म्हणाला , " मी थोड्या वेळेपूर्वीच तुला बघितलं पण तूच आहेस की नाही याची शंका होती म्हणून बोलू शकलो नाही ..किती दिवस झालेत मी तुला वेड्यासारखं शोधतोय ..नंबर पण बदलून घेतला आहेस आणि फ्लॅटला पण लॉक आहे ..आहेस तरी कुठे आणि काम देखील मधातच सोडून गेलीस .." ती आताही फक्त त्याच्याकडे पाहत होती ..आणि त्या व्यक्तीला तिच्यासोबत अजिंक्य आहे याचसुद्धा भान नव्हतं ..तो पून्हा एकदा म्हणाला , "