एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 7

  • 6k
  • 3k

आयुष्यात वादळांना खूप महत्त्वाचं स्थान असत..एकदाच वादळ येऊन निघून गेल की मागे साचलेली संपूर्ण घाण निघून जाते आणि बाकी उरत शांत , स्वच्छ वातावरण ..आयुष्यही असच एक कोड ..इथे प्रत्येक व्यक्ती जवळ असतो पण आयुष्यात वादळ आलं की आपले कोण आणि परके कोण याची जाणीव होते ..रियाच्या अजिंक्यच्या आयुष्यात येण्याने मृणाल - अजिंक्यच प्रेम आणखीच घट्ट झालं होतं ..वरून खलनायिका जरी ती वाटत असली तरीही तीच त्यांना नकळत एकमेकांजवळ आणत होती ..तेही जगू लागले बेभान होऊन .. साधारणता तीन महिने उलटून गेले होते ..या काळात अजिंक्य फक्त काम आणि कामच करीत होता परंतु मुलीप्रति , बायकोप्रति आणि कुटुंबाप्रति