कामचुकारपणा त्यांच्या रक्तात नव्हता तरी तो तिथं मनापासूनं काम मात्र करत नव्हता, आता पण तो डेक्स सोडून, बाहेर आला, तिथं जवळजवळ पाचशे कर्मचारी कानाला ते मोठालेवाले हेडफोन लावून समोरच्या कस्टमरला माहिती देण्याचं काम करतं होते, हयाचं मात्र अजिबात लक्ष नव्हतं, त्यांना दिवसाला दोनशे कॉल करणं कम्पलसरी होतं. हा मात्र नेमकेचं एकशे सत्तरच्या आसपास करी, त्यांचा सुपरवायझर त्याला फटकारात असे, त्याला मेमो देण्याची भाषा करे, हा मात्र “हा ट्राय करतो” सांगायचा पण झाट काही ऐकायचा नाही, तिथं सकाळी नऊ ते संध्याकाळी सहाची डयुटी होती, एक ते दीड लंच टाईम, दोन टाईम चहा भेटायचा तो पिण्यासाठी अजून पाच मिनिट प्रत्येकी म्हणजे एकूण