कादंबरी- जिवलगा ... भाग - १२

(22)
  • 21.9k
  • 15.6k

कादंबरी - जीवलगा .. भाग -१२ वा . ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------------------------------------------------------------- स्वतःशी संवाद करता येणे म्हणजे एक चिंतन -समाधी असते " अशा मानसिक अवस्थेत आपल्याला खूप काही जाणून घेता येत असते ,"आपणच आपले एक विश्लेषक होऊन विश्लेषण करू शकतो , याचा एक फायदा असा होतो ..तो म्हणजे ..आपल्यातील प्लस बाजू कोणत्या आणि मायनस बाजू कोणत्या ? हे उमगू लागते ,"प्रत्येकाने अधून-मधून आपल्या स्वतःचा धांडोळा घेता आला तर जरूर घेतला पाहिजे , स्वतःच्या बद्दल थोडी तरी जागरूकता आणि बांधिलकी मनात असायला हवी ".. खूप वेळा पासून नेहा हे पुस्तक वाचीत होती . आजकाल व्यक्तिमत्व -विकास ", या बद्दल मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे ",मधुरीमाने नेहाला हे