प्रेमस्पर्श मला तुला सोडून कधीच जाऊ वाटणार नाही..! पण तुला एकटीला इथेच सोडून जाणे माझ्याही हातात नाही , मी कितीही विनवणी केली तरी माझा आवाज कोणी ऐकणार नाही की तुझाही आवाज कोणी ऐकणार नाही, होरे माझंही तसच आहे तुझ्या काय आणि माझ्या काय दोघांच्याही मनात आले तरी काही करू शकत नाही, पण मात्र एक की मी तुझ्या आधी इथून जावे कारण तू इथून मला सोडून गेल्यानंतर मला इथे एकटीला तुझ्या विना एकही क्षण श्वास घेणं शक्य नाही. पण मला नेहमी वाटत आपण एकाच छताखाली हवे जे काही छोटे आयुष्य आहे आपले ते तुला मनापासून समोर पाहूनच जगावे तुझ्यातच रंगून जावे तुझ्या