मागील भागावरून पुढे......दुसऱ्या दिवशी सकाळी शेखर तयार होऊन खाली आला. बाळु ने त्याला कॉफ़ी आणून दिली. त्या दोघींची तयारी अजून झाली नव्हती. त्यांची वाट बघत शेखर चीं अजून एकदा कॉफी झाली. पण त्या दोघी काही निघण्याचे नाव काढत नव्हत्या.बराच वेळ झाल्यावर दोघी बाहेर आल्या. शेखर त्यांना बघतच बसला. दोघीही दिसायला सुंदरच होत्या. पण आता पूर्ण शृंगार केल्यावर तर त्यांच्या वरून नजर हटत नव्हती. सुजाता ने डार्क जीन्स वर यल्लो टॉप घातला होता. मोकळे सोडलेले केस. हातात मोठे घड्याळ दुसऱ्या हातात एक नाजूक ब्रेसलेट.... एकदम छान दिसत होती. सुकन्या ने मोरपिशी रंगाचा ड्रेस घातला होता. एका खांद्यावरून ओढणी सोडली होती. कानात