मच्छरवाणी- एक गुप्त वार्ता (एका मच्छरप्रमुखाचे भाषण)

  • 9.6k
  • 1
  • 2.7k

अंत्यत थोडया कालावधीत समाजात दूरवर पसरण्याची कला, तसेच समाजातील अस्वच्छ दुर्लक्षित परिसरात विशेष ठाण मांडून मोठमोठाल्या इस्पितळातील डॉक्टर लोकांस आपल्याविषयी दखल घेण्यास भाग पाडणा-या, नाजूक दिसूनही आपल्या ताकदीचे भान करुन देणा-या, हलक्या आणि उडत्या चालीचे म्हणून हीनवलेले जाणा-या आपल्या ‘मच्छर’ या कीटकजमातीस, त्यांच्या सामाजिक बांधिलकीविषयी आणि एकूणच त्यांच्या सदयस्थितीविषयी चावा संघटनेचा प्रमुख या नात्याने हा पत्रिकाप्रंपच मांडतो आहे. आजूबाजूला वाढणा-या मच्छर या आत्मक्लेशास उत्तम संधी असून मनुष्यास स्वतःस चारचौघात नकळत थोबाडीत मारुन घेण्यास मदत करतात. टपरीवरच्या चायवाल्यापासून बडया सूटबूटवाल्या इसमांपर्यंत स्पर्शकरुन देखील आपल्या मूळ जागेशी इमान राखण्याचा गुण अदयाप कोणत्याही प्रवचनात न सांगितल्याचे मला आश्चर्य वाटते. एका नाजूक टिचकीने समोरच्या