बंदिनी.. - 17

  • 9.3k
  • 1
  • 4k

....... मी अनय ला मेसेज करून मी निघाल्याचं कळवलं .. अंतर जवळ येत होतं तशी हुरहुर आणखी वाढत होती..... मन शांत ठेवण्यासाठी मी fm चालू केला आणि कानात earphone ? टाकले.. डोळे मिटून शांत बसून राहिले.. तरीही डोक्यात विचार चालूच होते... कशी असेल आमची पहिली भेट ? .. आता कसा दिसत असेल अनय?? ?.. फोटोज पाठवले होते एकमेकांना तसे.. पण प्रत्यक्ष आज बघणार होतो... दोन वर्षांनी...! मला बघितल्यावर त्याची reaction काय असेल??.. Huhh... किती वाट बघितली होती मी या क्षणाची... ? दोन वर्षे उलटून गेली तरी अनय च्या आठवणी अजूनही मनात तशाच रुंजी घालत होत्या.. जणू काल परवाच भेटलो होतो..