जुळले प्रेमाचे नाते - भाग-६१

(28)
  • 9.3k
  • 1
  • 4.1k

दुपारी निशांतसोबत घडलेला प्रसंग आठवुन मी अजून ही विचार करत होते... नक्की कोण करत असेल. "जर तो राज असेल तर..? पण राज का करत असेल.. त्याला हे करून काय मिळणार आहे.. निशांतला झालेली दुखापत मोठी नव्हती.. पण ती आज.. काय माहीत उद्या काय वाढून ठेवलंय.. "स्वतःशी विचार करत मी बेडवर पडले होते.. संध्याकाळी निशांतला भेटायला जाईल अस ठरवत होते, खर पण उगाच ओरडेल म्हणुन तो विचार डोक्यातून काढुन टाकला. स्वतःच्या विचारात असताना बाजूचा फोन वाजला आणि माझ्या हृदयाचे ठोके ही... घाबरतच स्क्रीनवर पाहिलं.. निशांतच नाव स्क्रीनवर बघून कुठे बर वाटल.. "हॅलो..., काय मॅडम.. किती वेळ लागतो एक कॉल घ्यायला. मला वाटलं झोपली