जुळले प्रेमाचे नाते - भाग-६०

(27)
  • 10.5k
  • 3
  • 4k

"पण नक्कीच ओळखीतला असावा. कारण त्याला कॉलेजमध्ये येण्याची परवानगी मिळाली होती. पण नक्की कोण..?" विचार करत असतानाच मागून निशांतने खांद्यावर हात ठेवला आणि मी दचकले. माझ्या दचकलेल्या चेहऱ्याकडे बघत त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं. मी फक्त एक नजर त्या पत्रावर टाकली आणि नजरेनेच निशांतला ते पत्र दखावले. "अरे परत पत्र??? कोणी दिलं.??" "माझ्या क्लासमधल्या एका मुलीने आणुन दिल. मी काही विचारण्या आधीच ती निघून गेली." "ठीक आहे. दे मी वाचतो." एवढं बोलून त्याने ते पत्र घेतलं आणि समोर बसुन वाचायला लागला. हे सगळं काही होत असताना मी निशांतच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होते. "हं..!! ठीक आहे. हा जो कोणी आहे ना तो नक्कीच आपल्या कॉलेजमधला आहे.