जुळले प्रेमाचे नाते - भाग-५९

(16)
  • 8.5k
  • 4
  • 4.1k

"अरे हा काय फालतुपणा आहे. प्राजु कोण होता तो..?? तो नक्कीच राज असणार. मूर्खपणा नुसता. आणि किती हे ट्विट्स तुझ्या आयुष्यात प्राजु !!" वृंदा चांगलीच भडकली होती. "अग तु शांत हो बघु. तीच बोलं तर पूर्ण ऐक." प्रिया तिला शांत करत बोलली. "हो.., माहीत आहे खुप ट्विट्स आहेत. पण हे घडलं आहे ग माझ्यासोबत मी तरी काय करणार. तूच सांग मला तुम्हाला अस माझ्या आयुष्याबद्दल खोटं सांगून काय मिळणार आहे ना...??" मी समजुतीच्या भावात बोलत होते."अग तु वेडी आहेस का...! आम्हचा विश्वास आहे तुझ्या बोलण्यावर. तु पूढे काय झालं ते सांग." सर्वाना शांत करत अभि मधेच बोलली.तो दिवस.., म्हणजे आमचं कॉलेज सुरू